
पिंपरी (Pclive7.com):- वाकड परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी वेणुनगर परिसरात विरंगुळा केंद्राचे भूमिपूजन समारंभ आज पार पडले. त्याचप्रमाणे विनायकदादा गायकवाड युथ फाऊंडेशनतर्फे ज्येष्ठ नागरिक सवलत पासचे वाटप करण्यात आले. यावेळी वाकड-पिंपळे निलख परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र होत आहे. याचा या परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. यावेळी बोलताना माजी नगरसेवक विनायक गायकवाड म्हणाले की, “वाकड परिसरात ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच सर्वांनी मिळून मागणी केलेली होती की आम्हा सर्व ज्येष्ठांसाठी एखादे ठिकाण हवे आहे. त्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने हे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत करीत आहोत. यामध्ये आपण व्यायामासाठी ओपन जिम, गझीबो, लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी व एक हॉलची व्यवस्था करीत आहोत. त्यामुळे या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. तसेच आता महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांना प्रवासाकरिता स्मार्ट कार्ड आवश्यक केले आहे. सर्व ज्येष्ठ नागरिकांना बसस्थानकात हेलपाटे मारावे लागत असे व त्यांना त्रास होत असल्या कारणाने आपण याठिकाणी सवलत पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याचा या परिसरातील जेष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत.”
या भूमिपूजन समारंभ प्रसंगी नगरसेवक आरती चोंधे, संदीप कस्पटे, सामाजिक कार्यकर्ते रामदास कस्पटे, पिंपरी चिंचवड फेडरेशनचे अध्यक्ष सुदेश राजे, सेक्रेटरी के.सी. गर्ग, अरुण देशमुख, तेजस्विनी ढोमसे व विविध ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व सभासद उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group