पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड परिसरात खून करून मागील ५ महिन्यांपासून फरार असलेल्या रावण टोळीतील तडीपार गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली. ससा उर्फ सागर उर्फ दशरथ राजकुमार वाघमोडे (वय २३, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेचे खंडणी दरोडा विरोधी पथकातील पोलीस पिंपरी परिसरात गस्त घालत असताना पोलीस शिपाई सागर शेडगे यांना माहिती मिळाली की, चिंचवड येथील खुनाच्या गुन्ह्यातील गुन्हेगार ‘ससा’ पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयाच्या गेटसमोर कोणाची तरी वाट पाहत थांबला आहे. त्यानुसार पोलिसांनी वायसीएम परिसरात सापळा रचून सशाला ताब्यात घेतले.आरोपीस सशावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. त्याने कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता पुणे जिल्ह्यात प्रवेश केल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्याच्यावर तडीपारीच्या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड येथील एका खुनाच्या गुन्ह्यात तो फरार होता. तसेच त्याच्यावर निगडी, देहूरोड, चिंचवड पोलीस ठाण्यात एकूण दहा गुन्ह्यांची नोंद आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उपनिरीक्षक अनिकेत हिवरकर, पोलीस कर्मचारी अजय भोसले, उमेश पुलगम, आशिष बोटके, निशांत काळे, विक्रांत गायकवाड, सागर शेडगे यांच्या पथकाने केली आहे.
























Join Our Whatsapp Group