महाराष्ट्र राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर
मुंबई (Pclive7.com):- उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील निधनाच्या वृत्ताने राज्यावर शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त करत अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “अजितदादा हे संघर्षशील आणि दमदार नेतृत्व होते. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अत्यंत कठीण आहे. माझा जिवलग मित्र आपल्यातून निघून गेला आहे. दादांचे जाणे मनाला चटका लावणारे आहे.”
राज्य सरकारकडून अजितदादा पवार यांच्या निधनाबद्दल तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या काळात शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात येणार असून शासकीय इमारतींवर ध्वज अर्ध्यावर फडकवण्यात येणार आहेत.

राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अजितदादांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्या योगदानाची कायम आठवण राहील, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.





















Join Our Whatsapp Group