पाण्यात बसून सामाजिक कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरू
पिंपरी (Pclive7.com):- यमुनानगर परिसरात पाणीपुरवठा व विद्युत वितरण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. विशेष म्हणजे, एकीकडे मोठ्या प्रमाणात पाणी गळती होऊन पाणी वाया जात असताना दुसरीकडे मागील तीन दिवसांपासून परिसरातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. याचाच निषेध म्हणून सामाजिक कार्यकर्ते बाबा परब, मनोज लांडगे यांनी पाण्यात बसून आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

स्थानिक रहिवाशांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागांकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप केला जात आहे. पाणीटंचाईमुळे नागरिकांना पिण्याचे व दैनंदिन वापराचे पाणी मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनाविरोधात संतापाची भावना निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते बाबा परब, मनोज लांडगे यांनी पाण्यात बसून आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. “नागरिकांना पाणी मिळत नाही आणि दुसरीकडे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने याची दखल घेऊन समस्या सोडवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.
नागरिकांनीही पाणीगळती तात्काळ थांबवून नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे. आता प्रशासन या गंभीर समस्येकडे कितपत गांभीर्याने पाहते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.




















Join Our Whatsapp Group