पिंपरी (Pclive7.com):- भारतीय राष्ट्रवादी पार्टीच्या पिंपरी चिंचवड शहराच्या महिला अध्यक्षपदी भारती कदम यांची निवड करण्यात आली. तसेच यावेळी भोर-वेल्हा-मुळशी तालुका युवा अध्यक्षपदी कु.निलेश ढमाले यांची देखील नियुक्ती करण्यात आली.
ही निवड पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.गुलाबसिंह यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आली. निवडीचे पत्र देताना भारतीय राष्ट्रवादी युवा पार्टीचे महाराष्ट्राचे युवा प्रदेशाध्यक्ष अजित संचेती, व महाराष्ट्राचे युवा वरिष्ठ उपाध्यक्ष संदीप गायकवाड, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजयभाऊ भोईर, युवा उपाध्यक्ष गिरीश पाटील, चिंचवड विधानसभा अध्यक्ष निमिष पळशीकर, दीपक पिंपळे, विशाल घोंगडे उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group