पिंपरी (Pclive7.com):- केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात मागील अडीच महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत. या शेतकरी आंदोलनामुळे सध्या देशातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. विरोधकांकडून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. राज्यसभा, लोकसभेत देखील या मुद्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आज राजस्थानमधील अजमेर येथून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला.
कृषी कायदे लागू करणं हे बेरोजगारीचं कारण ठरेल. पंतप्रधान म्हणत आहेत की ते पर्याय देत आहे. हो त्यांनी दिला आहे : भूक, बेरोजगारी आणि आत्महत्या. ते शेतकऱ्यांची चर्चा करू इच्छितात, मात्र ते तोपर्यंत बोलू शकणार नाहीत जोपर्यंत कायदे रद्द होत नाहीत. शेती भारत मातेची आहे, उद्योजकांची नाही. असं राहुल गांधी म्हणाले आहेत.
राजस्थानमधील रुपनगढ येथे आज (शनिवार) राहुल गांधी यांनी किसान महापंचायतीला संबोधित केलं. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली देखील काढली, राहुल गांधींनी ट्रॅक्टरवर बसून या रॅलीची सुरूवात केली.
या अगोदर केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी सरकारवर हल्ला चढविला होता. या कायद्यांमुळे बड्या उद्योगपतींना अमर्यादित धान्य खरेदी करता येईल आणि त्याचा साठाही करता येईल, असे ते म्हणाले होते. तसेच, यावेळी कुटुंब नियोजनासंदर्भातील हम दो, हमारे दो या जुन्या घोषणेचा संदर्भ दिला आणि केवळ चार-पाच जण देशाचा कारभार करीत असल्याची टीका देखील राहुल गांधींनी केली होती.
























Join Our Whatsapp Group