पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच आणखी एक संकट चालून आले आहे. शहरातील विविध लसीकरण केंद्रांवर कोरोनावरील लशींचा तुटवडा जाणवू लागला आहे. महापालिकेकडे लसीचे फक्त १५ हजार डोस शिल्लक असून ते आज (दि.०८) दिवसभरात संपतील. लसीअभावी लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ येण्याची शक्यता असल्याने महापालिकेला लसीकरणही थांबवावे लागू शकते.
पिंपरी चिंचवड शहरात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या आणि दुस-या टप्प्यात वैद्यकिय क्षेत्रातील अधिकारी-कर्मचारी, फ्रंटर वर्कर यांना लस देण्यात आली. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा तिसरा टप्पा १ मार्च पासून सुरु झाला आहे. या टप्प्यात ४५ ते ५९ वयोगटातील व्याधीग्रस्त व्यक्ती (को-मॉर्बिड) आणि ६० वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस देण्यात येत आहे.
आता १ एप्रिलपासून ४५ वर्षांपुढील सर्वांना लस दिली जात आहे. तेव्हापासून महापालिकेचे लसीकरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आजपर्यंत २ लाख २० हजार ८५३ जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.
महापालिकेने कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारांबरोबर लसीकरणवरही भर दिला आहे. महापालिकेची ५८ आणि खासगी २९ अशी ८७ लसीकरण केंद्रे कार्यान्वित आहेत. झोपडपट्टीतील नागरिकांना लसीकरण केंद्रावर घेवून जावून महापालिका लसीकरण करत आहे. दिवसाला १५ हजारहून अधिक नागरिकांना लस दिली जाते.
महापालिकेला लसीचा पुरवठा कमी होत आहे. महापालिकेकडे केवळ १५ हजार कोरोना लसीचे डोस शिल्लक आहेत. उद्या दिवसभरात हे डोस संपतील. परिणामी, लसीकरण थांबवावे लागू शकते.
























Join Our Whatsapp Group