पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रीय स्वयं सेवक संघ जनकल्याण समिती व स्वर्गीय तात्या बापट स्मृती समिती संचालित covid- आयसोल्युशन सेंटर यमुनानगर येथे आज अमित गोरखे युथ फाउंडेशनच्या वतीने कोरोना रुग्णांसाठी शत-प्लस हे औषधाचे वाटप मोफत करण्यात आले.
त्याप्रसंगी covid- आयसोलेशन सेंटरचे व्यवस्थापक विनोद डोरले, पराग सहस्रबुद्धे, अमित गोरखे, शेखर साळवे, निलेश क्षीरसागर, अमोल कुचेकर उपस्थिती होते.
शतप्लस कोरोनावर प्रभावी गुणकारी औषध असून औषधामध्ये अँटी ऑक्सिडेंट, अँटी इन्फर्मेशन, अँटी वायरल रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे इत्यादी गुण आहेत. नायडू हॉस्पिटल मध्ये कोरोना चाचणीत सहयोगी औषध पद्धती म्हणून चांगल्या पद्धतीने हे औषध वापरले असून कोरोना रुग्णांमध्ये चांगली सुधारणा झाल्याचा अनुभव आलेला आहे.