पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीगाव येथील मित्र सहकार्य तरुण मंडळाच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नवीन जिजामाता रुग्णालयास १० बेड भेट स्वरूपात देण्यात आले. सदर रूग्णालय साहित्याचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता शहरातील शासकीय यंत्रणेवर ताण येत आहे. त्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून मित्र सहकार्य तरूण मंडळाने एक छोटासा खारीचा वाटा उचलून पिंपरीगाव येथील जिजामाता रुग्णालयास दहा बेड दिले आहेत. लोकवर्गणीतून आलेला निधी हा फक्त लोकहितासाठी वापरण्याचे काम वेगवेगळ्या मार्गाने मंडळ करत असते. म्हणून आजची परिस्थिती पहाता मंडळाने अशा प्रकारे मदत करण्याचा हा निर्णय घेतला आहे. हा उपक्रम पाहून समाजातील मंडळे व इतर सामाजिक संस्थांनी पुढे यावे असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले.
या लोकार्पण सोहळ्यासाठी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, स्थानिक नगरसेवक संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, नगरसेविका निकिता कदम, माजी नगरसेवक संतोष कुदळे, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कुदळे, संजय गायके आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंदा कुदळे यांनी केले. तर तर प्रास्ताविक संदीप कुदळे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन एकनाथ पारखे, कुणाल सातव, प्रसाद सातव, रवींद्र कदम, रोहन कोल्हे, डॉ. अनिकेत अमृतकर, अक्षय नानेकर, रामदास कुदळे, शक्ती खराडे, सोमेश जमदाडे, यांनी केले.
कोरोनाच्या या आपत्तीमध्ये मंडळाच्यावतीने सामाजिक बांधिलकी जपत करण्यात आलेल्या मदतीबद्दल जिजामाता रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता तिरूमणी यांनी मंडळाचे आभार मानले.






















Join Our Whatsapp Group