पिंपरी (Pclive7.com):- गणेशोत्सवाच्या पावन पर्वानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा, पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या घरी भेट देऊन घरगुती श्री गणरायाचे दर्शन घेण्यात आले.

युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष मयुरजी काळभोर, शहर उपाध्यक्षा देवयानीताई भिंगारकर सोमन, उपाध्यक्ष मनोजजी माळी तसेच मंडल अध्यक्ष विवेकजी बारोट यांच्या निवासस्थानी भेट देऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले.

या प्रसंगी भाजपा युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष दिनेशजी यादव, प्रदेश सचिव अजितजी कुलथे, उपाध्यक्ष मयुरजी काळभोर, मनोजजी घोडेकर, मंडल अध्यक्ष ऋषिकेश भालेकर तसेच विद्यार्थी संयोजक अध्यक्ष प्रतीकजी रामगुडे उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून युवा मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये स्नेह, आपुलकी आणि संघटनात्मक एकात्मता अधिक दृढ होत आहे. श्री गणरायाच्या आशीर्वादाने समाजसेवेचा संकल्प अधिक बळकट व्हावा, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.



















Join Our Whatsapp Group