पिंपरी (Pclive7.com):- वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेत एका ‘गोल्डमॅन’च्या चर्चित गोल्डन कारवर कारवाई करण्यात आली. वाहनाला काळ्या फिल्म लावणे तसेच निर्धारित HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) ऐवजी फॅन्सी नंबर प्लेटचा वापर केल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी ही कारवाई केली.

हिंजवडी वाहतूक विभागाकडून सध्या वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई सुरू आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांच्या नजरेस एक आकर्षक गोल्डन रंगाची कार पडली. तपासणी केली असता वाहनाच्या काचांवर काळी फिल्म लावण्यात आल्याचे तसेच वाहनावर नियमानुसार HSRP नंबर प्लेट नसून फॅन्सी नंबर प्लेट लावण्यात आल्याचे निदर्शनास आले.

यानंतर पोलिसांनी तत्काळ वाहनावरील काळी फिल्म काढून टाकली आणि संबंधित वाहन चालकाविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली. वाहतूक नियमांचे पालन करणे सर्व वाहनचालकांसाठी बंधनकारक असून फॅन्सी नंबर प्लेट, काळ्या काचा आणि इतर बेकायदेशीर बदलांविरोधात अशी कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
वाहतूक पोलिसांनी नागरिकांना वाहनांवर नियमबाह्य बदल टाळण्याचे आणि शासनाने निर्धारित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.
Tags: Black GlassFancy Number PlateGolden GuysGolden ManPcmc newsPimpri Chinchwad PolicePimpri Chinchwad Traffic Police


















Join Our Whatsapp Group