पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सदस्यपदी भाजपा नगरसेविका सुजाता पालांडे यांची नियुक्ती करण्यात आली. नाराज नगरसेवक रवि लांडगे यांचे सदस्यपद रद्द झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पालांडे यांची वर्णी लागली आहे. आज झालेल्या महापालिका सभेत पालांडे यांची निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर माई ढोरे होत्या.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. स्थायी समितीमध्ये सत्ताधारी भाजपाचे १० सदस्य, राष्ट्रवादीचे ४, अपक्ष १ आणि शिवसेना १ असे संख्याबळ आहे.
दरम्यान, स्थायी समिती सभापतीपदी निवड व्हावी, अशी अपेक्षा असताना भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी संधी दिली नाही. या कारणामुळे नाराज असलेले नगरसेवक रवि लांडगे यांनी सदस्यपदी नियुक्ती केली असतानाही स्थायी समितीच्या बैठकींना उपस्थिती दर्शवली नाही. त्यामुळे नियमानुसार प्रशासनाने रवि लांडगे यांचे सदस्यपद रद्द केले. या ठिकाणी सुजाता पालांडे यांना संधी दिली आहे.
सुजाता पालांडे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न…
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तिकीट नाकारल्यामुळे राष्ट्रवादीच्या तत्कालीन महिला शहराध्यक्षा सुजाता पालांडे यांनी २०१७ च्या निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला होता. क्षमता असतानाही महत्त्वाच्या पदावर भाजपाच्या संधी दिली नाही. त्यामुळे पालांडे नाराज आहेत, अशी चर्चा होती. दरम्यान, स्थायी समिती सदस्यपदी संधी देत शेवटच्या चार-पाच महिन्यांमध्ये भाजपाने पालांडे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे, असे बोलले जात आहे.
























Join Our Whatsapp Group