पिंपरी (Pclive7.com):- केंद्रीय तपास यंत्रणांचा केंद्र सरकार गैर वापर करत आहे आणि हे यापूर्वी कधीही पाहायला मिळालेले नाही. सर्वच कुटुंबियांवर अशा धाडी टाकणे योग्य नसल्याचे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे. ते पिंपरी चिंचवडमध्ये प्रसासमाध्यमांशी बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर पडलेल्या छाप्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवर धाडी मारण्यात आल्या आहेत. गेल्या तीन दिवसांपासून आयकर विभागाने हे धाडसत्रं सुरू केलं आहे. त्यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एखाद्या व्यक्तीच्या घरी चौकशी करणं ठिक, पण नातेवाईकांच्या घरी जाणं हे काही बरोबर नाही, असं दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटलं आहे.
केंद्र सरकार त्यांच्याकडे असलेल्या एजन्सी आणि सत्तेचा वापर राजकीय कारणासाठी करत आहेत. या पूर्वीच्या काळात राजकारणात कधीही अशी परिस्थिती पाहिली नव्हती. एखाद्याच्या घरी चौकशी करणं ठीक आहे. परंतु सगळ्या नातेवाईकांच्या घरी जाणं आणि त्यांना त्रास देणं हे बरं नाही, असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान आर्यन खान प्रकरणात किरण गोसावी आणि भाजप पदाधिकारी मनीष भानुशाली उपस्थित असणे चुकीचे असल्याचेही पाटील म्हणाले. पुण्यतील फसवणूक प्रकरणात किरण गोसावी यांना अजून अटक केलेलं नसल्याचेही ते म्हणाले.
























Join Our Whatsapp Group