पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरामध्ये विविध ठिकाणी विकासकामे पुर्ण करण्यात आली असुन तसेच काही विकास कामे सुरु करावयाची आहेत. पुर्ण झालेल्या विकास कामांचा उद्घाटन समारंभ व नव्याने सुरु करावयाच्या कामांचा भूमीपुजन समारंभ महापौर उषा उर्फ माई ढोरे यांचे अध्यक्षतेखाली व आमदार चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष भाजपा यांचे हस्ते उद्या (बुधवार दि. ०५ जानेवारी २०२२ रोजी) सकाळी ११ वाजल्या पासून होणार आहे.

या कार्यक्रमास महेश लांडगे-आमदार तथा भाजपा शहराध्यक्ष, लक्ष्मण जगताप -आमदार, स्थायी समिती सभापती नितिन लांडगे, उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके व पदाधिकारी, नगरसेवक व नागरीक उपस्थित राहणार आहेत.
याबाबत सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले की, उद्या बुधवार दि.०५ जानेवारी २०२२ रोजी आमदार चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष भाजपा यांचे शुभहस्ते स. ११.०० वा. पासून प्रभाग क्र. २६ व २८ साई चौक, जगताप डेअरी वाकड कडून नाशिक फाट्याकडे जाणा-या ग्रेडसेपरेटर बांधकामाचे उद्घाटन, वैदू वस्ती, पिंपळे गुरव येथे श्रीमती शेवंताबाई खंडूजी जगताप – माध्यमिक शाळा क्र. ५८ चा भूमीपूजन समारंभ, पिंपळे गुरव सृष्टी चौक येथील लहान मुलांच्या खेळाच्या मैदानाचे उद्घाटन, प्रभाग क्र. २९ सुदर्शन नगर येथील बीआरटीएस विभागा अंतर्गत नाशिक फाटा व वाकड या बीआरटीएस रस्त्यावर समतल विलगकाचे उद्घाटन, प्रभाग क्र. १७ बिजलीनगर येथे आकुर्डी रेल्वे स्टेशनकडे जाणारा भुयारी मार्गाचे उद्घाटन तसेच डांगे चौक येथे हिंजवडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नव्याने विकसित करण्यात आलेल्या ग्रेडसेपरेटरचे उद्घाटन – डांगे चौक येथे होणार आहे. या उद्घाटन व भूमीपुजन समारंभासाठी शहरातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहनही त्यांनी केले.