पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी क्रीडा सभापती, माजी नगरसेवक उत्तम केंदळे यांच्या अभिष्टचिंतन सोहळा निमित्त उद्या बुधवार दि.२९ जून २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता निगडी येथील ठाकरे मैदान स्केटिंग रिंग या ठिकाणी प्रसिद्ध व्याख्याते शरद पोंक्षे यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर व्याख्यान आयोजित केले आहे.

‘स्वातंत्र्यानंतर सुमारे ५० वर्षांहून अधिक काळ काँग्रेसची ‘गल्ली ते दिल्ली’ सत्ता होती. या काळात शक्य त्या मार्गाने स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु, स्वातंत्र्यवीर सावरकर हा सूर्य कधी मावळला नाही, तो कधी मावळणारही नाही’ अशा परखड शब्दात आपली मते व्यक्त करणारे प्रसिद्ध अभिनेते व्याख्याते शरद पोंक्षे सावरकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला प्रभागातील व शहरातील नागरिकांनी उपस्थित रहावे अशी विनंती क्रांतीवीर मित्र मंडळ यमुनानगर यांच्या वतीने करण्यात आली आहे.





















Join Our Whatsapp Group