पिंपरी (Pclive7.com):- एकनाथ शिंदे यांच्या समर्थनाचा फ्लेक्स पिंपरीतील मोरवाडी चौकात झळकल्याने एकच खळबळ उडाली. मात्र शहातील शिवसैनिकांना ही माहिती मिळताच त्यांनी हा फ्लेक्स फाडून टाकला आहे. दरम्यान नेमका हा फ्लेक्स कोणी लावला याची माहीती मिळू शकली नाही.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रात शिवसेनेमध्ये उभी फूट पडली असताना पिंपरी चिंचवडमध्ये मात्र शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा व्यक्त केला आहे. काल संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेत शहरात शिवसेना एकसंध असल्याचं स्पष्ट केले. मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी शहरामध्ये मोरवाडी चौकात एकनाथ शिंदे समर्थनात फ्लेक्स लागले आहे. मात्र काही वेळातच शिवसैनिकांनी हे फ्लेक्स फाडून टाकले आहे. सचिन अहिर कालच शहात येऊन गेले असताना त्याच्या दुसऱ्याच दिवशी फ्लेक्स लागल्याने ते नेमकं कोणी लावलं याची चर्चा सुरू झालीय.
दरम्यान शिंदे यांच्या समर्थनाचा फ्लेक्स पिंपरीत लागल्याचे समजताच गणेश आहेर, रोमी संधू, सय्यद पटेल, तुषार नवले, गोरख पाटील, प्रदीप दळवी आदी शिवसैनिकांनी हे पोस्टर फाडून टाकले आहे. तसेच यावेळी मुख्यमंत्री यांच्या समर्थनात घोषणाबाजी देखील करण्यात आली.
Tags: Eknath ShindeFlexPimpri chinchwad shivsenashivsenaएकनाथ शिंदेपिंपरी चिंचवडफ्लेक्सफ्लेक्स फाडलामोरवाडी चौकशिंदे समर्थनशिवसैनिक





















Join Our Whatsapp Group