पिंपरी (प्रतिनिधी):- पिंपळे निलख प्रभागाचे भाजपचे नगरसेवक तुषार कामठे मित्र परिवार व सुखकर्ता प्रतिष्ठान यांच्यावतीने विजयादशमी निमित्त भव्य रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाबाबत माहिती देताना तुषार कामठे म्हणाले की, पिंपळे निलख येथे गेल्या आठ वर्षापासून नगरसेवक तुषार कामठे मित्र परिवार व सुखकर्ता प्रतिष्ठानच्या वतीने रावण दहनाचे आयोजन मोठ्या उत्साहात केले जाते. यंदाचे हे नववे वर्ष आहे. शनिवार दि.३० रोजी सायंकाळी पिंपळे निलख येथील मेन बस स्टॉप येथे हा कार्यक्रम होणार आहे. यावर्षी ४० फूट उंचीच्या रावणाचे दहन होणार आहे. यावेळी महिलांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे. महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा तसेच आरोग्य शिबीर देखील घेण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला खरी रंगत दसरा जल्लोष नृत्य व संगीताच्या विविध कार्यक्रमाने येणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ‘फेमस डान्सर’ मानसी नाईक हिचे असून सोबतच अभिनेत्री भाग्यश्री मोठे व सिध्दी कारखानीस यांची उपस्थिती देखील राहणार आहे. अशा या भव्य रावण दहनाच्या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नगरसेवक तुषार कामठे यांनी केले आहे.






















Join Our Whatsapp Group