पिंपरी (प्रतिनिधी):- दापोडी येथील सरस्वती आश्रमातील विद्यार्थ्यावर अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने उघडकीस आणला आहे. दहावीतील १६ वर्षीय मुलाने रेक्टरच्या मदतीने हे कृत्य केले असून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरस्वती आश्रमात दहावीतील १६ वर्षीय मुलाने ११ वर्षीय मुलावरच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना काही दिवसापूर्वी घडली होती. ही घटना रेक्टरने दाबून ठेवली होती. मात्र पीडित मुलाने हा प्रकार त्याच्या आईला सांगितल्यानंतर भोसरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी मुलासह रेक्टरलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.