पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेतील नवे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी शुक्रवारी (२३ सप्टेंबर) पदभार स्वीकारला. यापूर्वी ते वसई-विरारचे उपआयुक्त म्हणून कार्यरत होते. विकास ढाकणे यांची बदली झाल्यानंतर अतिरिक्त आयुक्तपदावर पालिकेतील उपआयुक्त स्मिता झगडे यांची वर्णी लागली होती. तथापि, या पदावर रुजू होण्यापूर्वीच त्यांची पदोन्नती रद्द करण्यात आली. त्यांना मूळ पदावर काम करण्याचे आदेश देण्यात आले.

त्या जागेवर जांभळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जांभळे शुक्रवारी सकाळीत शहरात दाखल झाले. काही प्रमुखांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर दुपारी मुख्यालयात येऊन त्यांनी पदभार स्वीकारला आहे.
Tags: Pcmc additional commissionerPcmc newsPradeep JambhalePradeep Jambhale Patilअतिरिक्त आयुक्तपदभार स्वीकारलापिंपरी चिंचवड महापालिकापिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी पदभार स्वीकारलाप्रदीप जांभळे

























Join Our Whatsapp Group