पिंपरी (प्रतिनिधी):- नांदेड महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाला मिळालेले घवघवीत यश हे या निवडणुकीत व्हिव्हिपॅट मशीन वापर आणि भाजपच्या परतीच्या प्रवासाचे संकेत असल्याची प्रतिक्रिया पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन साठे यांनी व्यक्त केली.
आज नांदेड महानगरपालिकेचा निवडणूक निकाल जाहीर झाला. यामध्ये काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने घवघवीत यश मिळविले. त्यानिमित्ताने पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन साठे आणि महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे यांनी संत तुकारामनगर पिंपरी येथे नागरीकांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सेवादलाचे शहराध्यक्ष संग्राम तावडे, एनएसयुआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे, चिंचवड युवक अध्यक्ष मयुर जैयस्वाल, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्रसिंह वालिया, ज्येष्ठ नागरीक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रुपनर, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, तारीक रिझवी, भाऊसाहेब मुगूटमल, हिरा जाधव, नंदा तुळसे, अर्जुन खंडागळे, विठ्ठल कळसे, सागर धावडे, इर्शाद शेख आदी उपस्थित होते.