
मंगेश संजय पोस्ते वय- १९ असे खून झालेल्या वेटरचे नाव आहे. तर, अजित अमूत मुठकुळे वय- ३२, सचिन सुभाष भवर वय- २२ अशी जखमी व्यक्तींची नावे आहेत. विजयराज वाघिरे आणि त्याचा साथीदार पुनीत सचदेव यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विशाल महादू रजाळे यांनी सांगवी पोलिसात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथे सासरवाडी नावाची एक मटण खानावळ आहे. तिथे आरोपी विजयराज आणि त्याचा मित्र पुनीत हे नेहमी जेवायला जायचे. परंतु, मंगळवारी मटणाच्या सूपमध्ये भात आला यावरून आरोपी विजयराज आणि त्याच्या साथीदार पुनीत याने वेटर अजित अमूत मुठकुळे, सचिन सुभाष भवर आणि मयत मंगेशला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. हॉटेलची सर्व्हिस चांगली नाही. जेवण ही चांगले देत नाही म्हणत त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. यात मंगेशचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस आरोपींना ताब्यात घेतले आहे.






















Join Our Whatsapp Group