पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या पिंपरी कॅम्पात अतिक्रम कारवाईवेळी व्यापारी आणि अतिक्रमण पथकाच्या अधिका-यांमध्ये वादावादी झाली. वादावादीचे नेमके कारण अद्याप पुढे आले नाही. दरम्यान, व्यापा-यांनी दुकाने बंद करत कारवाईचा निषेध केला.

पिंपरी कॅम्प ही शहरातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. कॅम्पातील अतिक्रमणाबाबत सातत्याने तक्रारी असतात. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिक्रमण पथक आज गुरुवारी कारवाईसाठी कॅम्पात दाखल झाले. कारवाईदरम्यान व्यापारी आणि अतिक्रमण पथकातील अधिका-यांमध्ये काही कारणामुळे वादावादी झाले. त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. व्यापा-यांनी दुकाने बंद करुन कारवाईचा निषेध केला. शगुन चौकात एकत्र येत व्यापा-यांनी कारवाई विरोधात आंदोलन केले.
दरम्यान, पोलीसही कॅम्पात दाखल झाले आहेत. माजी नगरसेवक डब्बू आसवाणी, पिंपरी मर्चंन्ट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी तिथे दाखल झाले आहेत.





















Join Our Whatsapp Group