पिंपरी (Pclive7.com):- मित्राचा खून करून पसार झालेल्या आरोपीस २४ तासाच्या आत रावेत पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने पुनावळे येथे सापळा रचून अटक केली आहे.

या प्रकरणी सोमनाथ बडदाळे (वय ३८ वर्षे, रा. सध्या आकुर्डी स्टेशनवर मोकळ्या जागेत) या आरोपीला अटक करण्यात आले आहे. ३ जानेवारी रोजी राजेश जाधव (वय ३८ वर्ष, रा. चिंचवड) या तरुणाचा खून झाला होता. त्याचा जागा मालक विकास जाधव याने या प्रकरणी फिर्याद दिली होती. राजेश याचा फोन घटनास्थळी आढळून आला नाही. या दरम्यान सोमनाथ हा राजेश याचा मित्र असून त्यानेच राजेश याचा खून केल्याचा संशय पोलिसांना आला.
पोलिसांनी सापळा रचून सोमनाथ याला पुनावळे येथून अटक केली. या दरम्यान राजेश याचा फोन सोमनाथकडे आढळून आल्याने पोलिसांची खात्री पटली. सोमनाथ याने पूर्व वैमानस्यातून राजेश याचा डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून खून केल्याचे कबूल केले. या प्रकरणी अधिक तपास रावेत पोलीस करत आहेत.
Tags: २४ तासांच्या आत खुनाचा तपासCrime NewsRavet MurderRavet NewsRavet Policeआरोपीस अटकमित्राचा खूनरावेत पोलीस





















Join Our Whatsapp Group