पिंपरी (Pclive7.com):- आकुर्डी येथील म्हाळसाकांत शाळेजवळ आज सकाळी नऊच्या सुमारास एका डंपरने दुचाकीला धडक दिली. यामध्ये एका महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला.
आशिष दीपक पावसकर (वय, २१ शुभश्री सोसायटी, आकुर्डी) असे मयत तरुणाचे नाव असून तो सिम्बायोसिस महाविद्यालयात इंजिनिअरिंगला शिकत होता. तर त्याचे वडील मुंबईला राहतात. आई शिक्षिका असून आई व मुलगा दोघेही आकुर्डीत राहतात.
मिळालेल्या माहितीनुसार, आशिष त्याच्या मित्रासोबत (एम एच १४ एआय ८७४८) या अॅक्टिव्हा गाडीवरून खंडोबा चौकातून म्हाळसकांत चौकात जात होता. यावेळी त्याला नवीन चासी असणाऱ्या डंपरने धडक दिली. यात आशिषच्या डाव्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व तो जागीच मरण पावला तर त्याचा मित्रही गंभीर जखमी झाला आहे. जखमी मित्र व आशिषला वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आले असून डंपर चालकाला निगडी पोलिसांच्या ताब्यात आहे.