पिंपरी (Pclive7.com):- लोकजनशक्ती पार्टी आणि भीमपुत्र ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक आणि परिसरात चौकात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सोशल मीडियावर येथील अस्वच्छतेबाबत ‘पोस्ट’व्हायरल झाली होती. त्यामुळे आज स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
लोकजनशक्ती पार्टीचे शहराध्यक्ष धुराजी शिंदे, भीमपुत्र ग्रुपचे अध्यक्ष अतुल जगताप, अरुण मैराळे, दत्ता गोडसे, ज्ञानेश्वर बोरकर, दिनकर ओव्हाळ, संजय ओव्हाळ, ज्ञानेश्वर बोराटे, शरद कांबळे, अनिल काकडे, प्रकाश अरसुमुळ, राज साबळे, अंकुश सागर, सुनील घबाळे, मनोज टिगोटे आदी या वेळी भीमपूत्र ग्रुपचे अध्यक्ष अतुल जगताप आदी या वेळी उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group