चिंचवड (Pclive7.com):- चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक शेवटी जनतेनेच हातात घेतली होती. त्यामुळे महाविकास आघाडीचा विजय निश्चित होईल असा विश्वास नाना काटे यांनी व्यक्त केला.

नाना काटे म्हणाले की, माझ्या आयुष्यातील न विसरता येणारी ही निवडणुक झाली. माझी उमेदवारी जाहिर झाल्या पासून मतदान प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत ही निवडणुक कार्यकर्त्यांनी हातात घेतली होती. प्रत्येक कार्यकर्ता हा ‘नाना काटे’ समजूनच काम करीत होता. शेवटी जनतेनेच निवडणूक हातात घेतली ही परीस्थिती निर्माण झाल्यानंतर पराभवाच्या भितीन पैशाची लालूच देने, पोलिस यंत्रणेचा गैर वापर करणे, कार्यकर्त्यांना धमकावणे असे ही प्रकार झाले मात्र त्याचा कुठेही परीणाम होवू न देता अगदी नेटान आणि त्वेषान कार्यकर्त लढले आणि म्हणून मी त्या प्रत्येक कार्यकर्त्यांचा, मतदारांचा, मनापासून ‘ऋणी आहे, हे उपकार मी कधीच विसरू शकत नाही.
संपूर्ण मतदार संघात फिरत असताना, मतदारांच्या चेह-यावर दिसणार , हास्यच मला विजयाची खात्री देत होते. शेवटी एकीच बळ मिळणार फळ” हा वाक्यप्रचार महाआघाडीच्या विजयाने सत्यात उतरणार आहे असे नाना काटे यांनी म्हटले आहे.






















Join Our Whatsapp Group