पिंपरी (Pclive7.com):- राज्य उत्पादन शुल्क विभागाने पिंपरी चिंचवडसह भिवंडी, सातारा येथे छापे टाकत भेसळयुक्त ताडी तयार करणार्या टोळीच्या मुसक्या आवळल्या. या छापेमारीत चौघांना अटक केली असून तब्बल ५ हजार किलोचा रासायनिक साठा जप्त करण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने राज्यभर भेसळयुक्त ताडी विकणाऱ्या टोळीचा छडा लावला. पिंपरी चिंचवड शहरासह भिवंडी आणि सातारा येथे मोठ्या प्रमाणात छापेमारी करण्यात आली. या कारवाई तब्बल ५ हजार किलो रासायनिक साठा जप्त करत एकूण ३० लाखांपेक्षा जास्त मुद्देमालही हस्तगत केला आहे. सातारा जिल्ह्यातील अतित येथील अस्मिता केमिकल नावाच्या कारखान्यावर छापा टाकून तो सील करण्यात आला. या कारवाईत टोळीतील ४ आरोपींनाही ताब्यात घेतल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे प्रमुख प्रसाद सास्तुरकर यांनी दिली आहे.
दरम्यान या कारवाई नंतर राज्यातील प्रत्येक शहरातील ताडी विक्री केंद्रातून विकल्या जाणाऱ्या ताडीच्या शुद्धेतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.





















Join Our Whatsapp Group