पुणे (Pclive7.com):- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा एकदा वादाच्या भोवर्यात अडकले असून शाकाहारी विद्यार्थ्यालाच सुवर्ण पदक मिळणार असा अजब फतवा काढण्यात आला आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर कीर्तनकार शेलारमामा यांच्या नावाने सुवर्णपदक देण्यासाठी पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यात केवळ शाकाहारी विद्यार्थ्यालाच हे सुवर्णपदक मिळेल, अशी अजब अट टाकण्यात आली आहे. विद्यापीठाच्या या अजब कारभाराचा विरोध करत आरपीई व जनता दल युनाईटेडच्या विद्यार्थी संघटनेच्यावतीने विद्यापीठाच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर कीर्तनकार शेलारमामा यांच्या नावाने सुवर्णपदक देण्यासाठी पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या पत्रकात काही अजब अटी टाकण्यात आल्या असून केवळ शाकाहारी विद्यार्थ्यालाच हे सुवर्णपदक मिळेल, अशी अजब अट त्यात आहे. या पदकांसाठी महाविद्यालयांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. यासाठी विज्ञानेत्तर शाखेचा विद्यार्थी पात्र असणार आहे. या पत्रकात अटींची मोठी जंत्रीच देण्यात आली असून विद्यार्थी दहावी, बारावी आणि पदवी परीक्षेतील प्रथम किंवा द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण असावा त्यातही ध्यानधारणा, प्राणायाम, योगासने करणार्या विद्यार्थ्यास प्राधान्य आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हा विद्यार्थी शाकाहारी आणि निर्व्यसनी असावा. अशी अजब अट यामध्ये देण्यात आली आहे.
दरम्यान, सदर सुवर्णपदक २००६ पासून देण्यात येत असून यामध्ये यासोबतच अनेक अटी आहेत. पुरस्कार देणार्यांकडून घालण्यात आलेल्या अटी असल्याने शाकाहारी असावा, अशी अट टाकण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. ए. डी. शाळीग्राम यांनी दिली.





















Join Our Whatsapp Group