पिंपरी (Pclive7.com):- आरोग्यदायी, पर्यावरणाला अनुकूल अशी ‘स्मार्ट सायकल शेअरिंग सेवा’ अशी एक अनोखी सेवा पिंपळे सौदागर येथील रोझलँड रेसिडेन्सी आणि पेडल याच्या संयुक्त विद्यमाने आज येथे सुरु करण्यात आली. ज्यांना सायकल चालविण्याची इच्छा आहे, परंतु सायकल नसल्यामुळे ही इच्छा पूर्ण होऊ शकत नाही अशांसाठी नाममात्र भाडे देऊन सायकल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सेवेच्या उद्घाटनानिमित्त आज रोझलँड रेसिडेन्सी मधील रहिवाशांनी सायकल रॅली काढली होती. या रॅलीमध्ये आसपासच्या सोसायटीमधील रहिवासी आणि नागरिकांनी सहभाग घेतला.
या सायकल रॅलीचे उद्घाटन नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रोझलँड रेसिडेन्सीचे अध्यक्ष संतोष म्हसकर, सचिव आनंद दफ्तरदार, चंदन चौरसिया, सचिव सिध्दार्थ नाईक, बाबासाहेब साठे, अभय कुलकर्णी, मिथुन गोडबोले आदी उपस्थित होते.
ज्यांना परिसरामध्ये सायकल चालविण्याची इच्छा आहे, परंतु सायकल नसल्यामुळे ही इच्छा पूर्ण होऊ शकत नाही अशांसाठी अर्ध्या तासासाठी फक्त १० रुपये या नाममात्र भाड्यावर सायकल उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना संतोष म्हसकर म्हणाले, “सोसायटीने खाजगी संस्थेबाबत सायकल भाडे तत्तावर देण्याची सेवा सुरु केली आहे. या सेवेमध्ये पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांना अर्धा तासासाठी १० रुपये भाड्याने सायकल उपलब्ध होईल. तसेच https://pedl.zoomcar.com/
सायकलप्रेमींना या सेवेबद्दल माहिती व्हावी आणि आरोग्यदायी, पर्यावरणाला अनुकूल अशा सायकलिंगचा त्यांना आनंद घेता यावा हा या रॅलीचा मुख्य उद्देश होता. लवकरच ही सेवा अन्य सोसायटीनमधून सुरु करण्याचे प्रयोजन आहे.