पिंपरी (Pclive7.com):- सांगवी परिसरात बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिकेची विक्री करून एका डॉक्टरची २७ लाख ५० हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना ऑक्टोबर २०१६ ते १६ ऑगस्ट २०२३ या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडली.

डॉ. सुरेश डोंगरसिंग नाईक (४३, रा. नवी सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, किरण शंकर गारवे, किशोर शंकर गारवे (दोघे रा. पिंपळे गुरव), यशवंत माधवराव बारहाते (रा. अहमदनगर) आणि एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींनी महापालिकेच्या बनावट शिक्क्यांचा वापर करून बांधकाम सुरू करण्यासाठी बनावट दाखला तयार केला. त्या आधारे व्यावसायिक इमारत बांधली. पहिल्या मजल्यावर तीन दुकाने करून सदनिका बांधल्याचे कागदोपत्री दाखवले. दरम्यान, सन २००५ मध्ये ती सदनिका यशवंत बारहाते यांना विकली. त्यानंतर आरोपींनी सन २०१६ मध्ये फिर्यादीकडून २७ लाख ५० हजार घेऊन सदनिकेची विक्री केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.






















Join Our Whatsapp Group