पिंपरी (Pclive7.com):- एका खासगी कंपनीच्या आवारातील विना परवाना ८ झाडे तोडणाऱ्या कंपनी मालक आणि ठेकेदार अशा दोघांवर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.१६) सायंकाळी एमआयडीसीतील कटफास्ट कंपनी, एफ-२ ब्लॉक, वंडरकार शोरूम जवळ घडला.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाचे उद्यान सहाय्यक सुहास एकनाथ सामसे (वय ४७, रा. मनीष गार्डन, पिंपरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार कंपनी मालक सुरेश जे बजाज आणि ठेकेदार राजेंद्र बाबु मांजरे (वय ३५, रा. बौध्दनगर, – निगडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी एफ-२ ब्लॉकमधील कटफास्ट कंपनी समोरील फुटपाथवरील आणि आवारातील झाडे तोडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याची माहिती वृक्षप्रेमींनी महापालिका आयुक्तांसह उद्यान विभागाला दिली. त्यानुसार उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांनी एमआयडीसी येथे जावून पाहणी केली. कटफास्ट कंपनी समोरील फुटपाथवरील ४ मोहोगणी, १ कांचन, १ केशिया, १ रेनट्रीचे झाड तर कंपनीच्या आतील आब्यांचे १ झाड अशी ८ झाडे विना परवाना तोडल्याचे आढळून आले.





















Join Our Whatsapp Group