ठाणे (Pclive7.com):- सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणात पोलिसांनी राजेश पाटील यांना अटक केली आहे. पाटील हे भाजप नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे भाचे आहेत.
या प्रकरणी सध्या अटकेत असलेला पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्याशी पाटील याची फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलीस याप्रकरणातील पाटील याचा सहभाग तपासत आहेत.
नवी मुंबईतील कळंबोली रोडपाली येथून दीड वर्षांपूर्वी बिद्रे बेपत्ता झाल्या आहेत. याप्रकरणी बिद्रे यांचे अपहरण करुन हत्या केल्याचा आरोप ठाणे ग्रामीण विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याच्यावर आहे.
अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने याची दखल घेत पोलिसांना प्रत्येक महिन्याला तपासाचा अहवाल देण्याचे आदेश दिले होते. यानंतर पोलिसांनी गांभीर्याने तपासाची चक्रे फिरविली आहेत.





















Join Our Whatsapp Group