पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड येथील औद्योगिक शिक्षण मंडळ संचलित कॉलेज ऑफ कॉमर्स-सायन्स ॲन्ड इंफर्मेशन टेक्नॉलॉजीच्या (सीएसआयटी) वतीने आयोजित केलेल्या “रन फॉर पिस ॲन्ड युनिटी ऑफ इंडिया” या मिनी मॅरेथॉनमध्ये ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. पावणेपाच किलोमीटरच्या या स्पर्धेत रोहित मगदूम याने प्रथम क्रमांक पटकविला.तर सचिन शिंगोडे, गजानन पाल हे अनुक्रमे द्वितीय, तृतीय क्रमांकावर राहिले.
कार्यक्रमाचे उदघाटनप्रसंगी नगरसेवक नामदेव ढाके, पोलीस उप निरीक्षक बाळासाहेब अंतरकर, पोलीस निरीक्षक डी.के म्हसे, प्राचार्य डॉ. के.एम जाधव, क्रीडा शिक्षक सावित्री मांढरे आदी उपस्थित होते. यावेळी उपनिरीक्षक अंतरकर यांनी विद्यार्थ्यांना शांतता व एकात्मतेविषयी शपथ दिली.
नामदेव ढाके म्हणाले कि, युवक हे देशाचे भविष्य आहे. युवकांनी देशाच्या विकासात योगदान द्यावेत. देशांत युवकच परिवर्तन घडवून आणू शकतात. क्रीडा उपक्रमांच्या माध्यमातून समाजात एकात्मता टिकविण्याचे कार्य होत आहे. क्रीडा उपक्रमातून विकास घडावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
आयबीएमआरचे प्रवेशद्वार ते मोरवाडी कोर्ट-आयुक्त बंगाला पुन्हा आयबीएमआर कॉलेज या मार्गाने विद्यार्थी धावले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूरी भाटीया तर आभार प्रिया जंजलवार यांनी मानले.