पिंपरी (Pclive7.com):- गणेशोत्सव काळात मिरवणूक निघत असतात. पाचव्या, सातव्या, नवव्या व दहाव्या किंवा शेवटच्या दिवशी गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. त्यामुळे शहरातील व पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या कक्षेतील काही रस्त्यांवर शनिवारी (दि.२३) पिंपरी व दापोडी वाहतूक विभागातील काही भागात बदल केला आहे. या भागांसह अन्य भागातील वाहतुकीतही सोमवार (दि.२५), बुधवार (दि.२७) आणि गुरुवारी (दि.२८) रोजी बदल केला जाणार आहे, असे पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी कळविले आहे.

पिंपरी विभाग..
२३, २५ व २८ सप्टेंबर दुपारी दोन ते रात्री अकरापर्यंत
बंद मार्ग : पिंपरी चौकाकडून शगुन चौकाकडे जाणारा मार्ग बंद.
पर्यायी मार्ग : पिंपरी पुलावरून उजवीकडे वळून भाटनगर मार्गे. मोरवाडी मार्गे एम्पायर इस्टेटच्या मदर टेरेसा ब्रिजवरून काळेवाडी मार्गे.
बंद मार्ग : काळेवाडी पुलावरून डीलक्स चौक, कराची चौकाकडे जाण्यास बंदी.
पर्यायी मार्ग : काळेवाडी पुलावरून उजवीकडे वळून जमतानी चौक व गेलार्ड चौकाकडे महात्मा फुले कॉलेज, डेअरी फार्म-मुंबई पुणे महामार्ग मार्गे.
बंद मार्ग : पिंपरी चौकातून गोकूळ हॉटेलकडे जाण्यास बंदी.
पर्यायी मार्ग : पिंपरी सर्विस रोडने क्रोमा शोरूम मार्गे.
दापोडी विभाग..
२३, २५ व २८ सप्टेंबर रोजी दुपारी दोन ते रात्री अकरापर्यंत
बंद मार्ग : फुगेवाडी- दापोडी ओव्हरब्रीज मार्गे शितळादेवी चौकाकडून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकाकडून पुण्याकडे जाणारा मार्ग.
पर्यायी मार्ग : शितळादेवी चौकातून सांगवी मार्गे. फुगेवाडी चौकातून हॅरिस ब्रिजच्या अंडरपासमधून बोपोडी मार्गे.
सांगवी विभाग..
२५ सप्टेंबर रोजी दुपारी चार ते रात्री बारापर्यंत
बंद मार्ग : कृष्णा चौकाकडून फेमस चौकाकडे जाणारा मार्ग बंद.
पर्यायी मार्ग : पाण्याची टाकी जुनी सांगवीमार्गे सांगवी महात्मा फुले ब्रिजमार्गे.
बंद मार्ग : माहेश्वरी चौकाकडून माकण हॉस्पिटल चौक जुनी सांगवीकडे जाणारा मार्ग.
पर्यायी मार्ग : बँक ऑफ महाराष्ट्र जुनी सांगवी मार्गे औंध किंवा पाण्याची टाकी जुनी सांगवी मार्गे सांगवी महात्मा फुले ब्रिज मार्गे.
बंद मार्ग : कृष्णा चौकाकडून साई चौक ते माहेश्वरी चौकाकडे जाण्यास बंदी.
पर्यायी मार्ग : काटेपूरम चौकातून डावीकडे वळून मयूरनगरी-एमके हॉटेल उजवीकडे वळून ढोरे फार्म-बा. रा. घोलप-महात्मा फुले ब्रिज मार्गे.
बंद मार्ग : कृष्णा चौकाकडून क्रांती चौक किंवा फेमस चौकाकडे जाणारा मार्ग बंद.
पर्यायी मार्ग : काटेपूरम चौकातून डावीकडे वळून मयूरनगरी- एमके हॉटेल उजवीकडे वळून ढोरे फार्म-बा. रा. घोलप- महात्मा फुले ब्रिज मार्गे.
बंद मार्ग : कृष्णा चौकाकडून साई चौकाकडे जाणारा मार्ग बंद.
पर्यायी मार्ग : काटेपूरम चौकातून डावीकडे वळून मयूरनगरी-एमके हॉटेल उजवीकडे वळून ढोरे फार्म- बा. रा. घोलप-महात्मा फुले ब्रिज मार्गे.
बंद मार्ग : साई चौक व कृष्णा चौकाकडून जुनी सांगवी पाण्याच्या टाकीकडे जाण्यास बंदी.
पर्यायी मार्ग : बा. रा. घोलप- ढोरे फार्म- एमके हॉटेल- मयूरनगरी- काटे पूरम चौक मार्गे.
बंद मार्ग : पाण्याची टाकी जुनी सांगवी ते बँक ऑफ महाराष्ट्र चौक, शितोळे पेट्रोल पंपाकडे जाण्यास बंदी. पर्यायी मार्ग : साई चौकातून पाण्याची टाकी जुनी सांगवी पोलिस चौकीजवळून महात्मा फुले ब्रिजकडून औंध मार्गे.
वाकड विभाग..
२८ सप्टेंबर रोजी दुपारी चार ते रात्री बारापर्यंत
बंद मार्ग : वाकड चौक व साठे चौक येथून दत्त मंदिर रस्त्यावर जाण्यास मनाई.
पर्यायी मार्ग : कावेरीनगर किंवा काळा खडक चौक मार्गे. आणि वाकड चौकातून कस्पटे कॉर्नर मार्गे.
बंद मार्ग : उत्कर्ष चौकाकडून दत्त मंदिर रोड वाकड येथे येणाऱ्या वाहनांना म्हातोबा चौक येथून प्रवेश बंदी. पर्यायी मार्ग : कस्पटे कॉर्नर मार्गे. गोलारीस हॉस्पिटल चौक दत्त मंदिर रोड, तसेच सम्राट चौक दत्त मंदिर रोड येथील वाहतूक गरजेनुसार वळवली जाणार.
चिंचवड विभाग..
२८ सप्टेंबर दुपारी तीन ते रात्री बारापर्यंत
बंद मार्ग : अहिंसा चौक ते चापेकर चौक
पर्यायी मार्ग : एसएएफ चौकातून खंडोबा माळ मार्गे.
बंद मार्ग : दळवीनगर ब्रिजकडून चापेकर चौक.
पर्यायी मार्ग : एसकेएफ चौकाकडून बिजलीनगर मार्गे.
बंद मार्ग : वाल्हेकरवाडी टी जंक्शनकडून चापेकर चौक
पर्यायी मार्ग : वाल्हेकरवाडी जुना जकात नाका डावीकडे वळून जैन शाळेपासून बिजलीनगर अथवा एसकेएफ-खंडोबा माळ मार्गे.
बंद मार्ग : लिंकरोडवरून चापेकर चौकातील पीएमटी बस थांबा येथून चापेकर चौकात जाण्यास बंदी.
पर्यायी मार्ग : लिंकरोडने काळेवाडी मार्गे.
बंद मार्ग : भोई आळी तसेच चिंचवड चौकी येथून चापेकर चौकात जाण्यास बंदी.
पर्यायी मार्ग : केशवनगर मार्गे
बंद मार्ग : चिंतामणी चौक-वाल्हेकरवाडी रिव्हर व्ह्यू चौकाकडे जाण्यास बंदी.
पर्यायी मार्ग : चिंचवडेफार्म वाल्हेकरवाडी लंडन ब्रिज रावेत मार्गे.
बंद मार्ग : अहिंसा चौक व रिव्हर व्ह्यू चौकाकडून चापेकर उड्डाणपुलावरून जाण्यास बंदी.
पर्यायी मार्ग : रिव्हर व्ह्यू चौकाकडून वाल्हेकरवाडी मार्गे. अथवा अहिंसा चौक ते महावीर चौक. अथवा एसकेएफ चौक मार्गे.
हिंजवडी विभाग..
२६, २७ व २८ सप्टेंबर दुपारी चार ते रात्री बारा वाजेपर्यंत
बंद मार्ग : टाटा टी जंक्शन चौकाकडून जॉमेट्रीकल सर्कल व शिवाजी चौकाकडे जाण्यास बंदी.
पर्यायी मार्ग : टाटा टी जंक्शन चौकाकडून लक्ष्मी चौक मार्गे.
बंद मार्ग : जॉमेट्रीकल सर्कल चौकाकडून मेझा ९ व शिवाजी चौकाकडे जाण्यास बंदी.
पर्यायी मार्ग : टाटा टी जंक्शन चौक- लक्ष्मी चौक मार्गे.
बंद मार्ग : मेझा ९ चौकाकडून शिवाजी चौकाकडे जाण्यास बंदी.
पर्यायी मार्ग : लक्ष्मी चौक मार्गे.
बंद मार्ग : शिवाजी चौकाकडून हिंजवडी गावठाणकडे जाण्यास बंदी.
पर्यायी मार्ग : शिवाजी चौक- विप्रो सर्कल फेज एक चौक- जॉमेट्रीकल सर्कल- टाटा टी जंक्शन मार्गे.
बंद मार्ग : कस्तुरी चौकाकडून शिवाजी चौकाकडे जाण्यास बंदी
पर्यायी मार्ग : विनोदे वस्ती कॉर्नर-लक्ष्मी चौक मार्गे.
बंद मार्ग : जांभूळकर जिम चौक, शिवाजी चौक व ताडीवाला रोडकडे जाण्यास बंदी
पर्यायी मार्ग : इंडियन ऑइल चौक- कस्तुरी चौक- विनोदे वस्ती कॉर्नर मार्गे.
बंद मार्ग : इंडियन ऑइल चौक, जांभूळकर जिम व शिवाजी चौकाकडे जाण्यास बंदी.
पर्यायी मार्ग : कस्तुरी चौकातून विनोदे वस्ती कॉर्नर मार्गे.
तळेगाव दाभाडे विभाग..
२५ सप्टेंबर दुपारी चार ते २६ सप्टेंबर सकाळी सहापर्यंत
बंद मार्ग : एचपी चौक येथून तळेगाव-चाकण रस्त्याने येणाऱ्या जड वाहनांना प्रवेश बंदी.
पर्यायी मार्ग : एचपी चौकातून आंबेठाण चौक-चाकण-शिंदे वासुली- नवलाख उंबरे-तळेगाव एमआयडीसी सर्कल मार्गे. एचपी चौकातून-भामचंद्र डोंगर मार्गे बदलवाडी-नवलाख उंबरे-तळेगाव एमआयडीसी सर्कल मार्गे.
बंद मार्ग : मुंबईकडून येणाऱ्या जड वाहनांना वडगाव फाटा- चाकण, नाशिककडे जाण्यासाठी प्रवेश बंद.
पर्यायी मार्ग : तळेगाव एमआयडीसी- नवलाख उंबरे- आंबेठाण चौक- शिंदे वासुली मार्गे. वडगाव फाटा- सोमाटणे फाटा- सेन्ट्रल चौक- भक्ती शक्ती- त्रिवेणीनगर मार्गे.