पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभा मतदारसंघात (१३ मे) रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे गेल्या महिनाभर सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा आज (दि.११) रोजी सायंकाळी सहा वाजता थंडावणार आहेत. मतदार संघात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते नितीन बानगुडे यांची रॅली व रोड शो होणार आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी लढत होत आहे. महायुती कडून शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे हे हॅट्रिक करण्यासाठी मैदानात आहेत. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संजोग वाघेरे पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महा रोडशो होणार आहे. चिंचवडमधील चाफेकर चौक येथून या रोड शोला सुरुवात होणार असून लिंक रोड, पिंपरी बाजारपेठ, काळेवाडीमार्गे डांगे चौक येथे या रॅलीचा समारोप होणार आहे. तर संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचाराला शिवसेना नेते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांच्या उपस्थितीत किवळे येथून रॅलीला सुरुवात होणार आहे. ही रॅली संपूर्ण चिंचवड मतदार संघात होणार असून काळेवाडीत या रॅलीचा समारोप होईल.