
पिंपरी (Pclive7.com):- पुणे रेल्वे स्थानकात इंद्रायणी एक्सप्रेसचा ३८ वा वर्धापन दिन (दि.२७) मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. यानिमित्त मासिक पासधारकांच्या डब्यात श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला अनेक प्रवासी व पासधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांमध्ये श्री समीर मारू, श्री भाईजान मुलाणी, श्री महेश आंबर्ले, श्री रोहित साळवी, श्री मयंक शहा, श्री वासुदेव दाराडे, श्री कुणाल कांबळे, श्री मंगेश ओहाळ, श्री सुजित दळवी, श्री सुधीर झोपे, श्री किशोर नांगवेकर, श्री अजित बनसोडे, श्री मुन्ना तांबोळी, श्री मन्सूर तांबोळी, श्री चिराग पाठक, श्री सुप्रिया शेळार, श्री राजेंद्र ओहाळ, श्री आनंद कट्टी, श्री विशाल मोरे, श्री सुमित खैरनार, श्री महेश साळुंखे, अश्विनी जाधव, श्री महेश खरात आणि श्री नीलमाधव प्रधान यांचा समावेश होता.

कार्यक्रमादरम्यान सर्व प्रवाशांच्या सुखकर व सुरक्षित प्रवासासाठी प्रार्थना करण्यात आली. तसेच उपस्थित सर्व पासधारकांच्या वतीने प्रवाशांना सुरक्षित आणि आनंददायी प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या अनोख्या उपक्रमामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.





















Join Our Whatsapp Group