पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील प्रसिध्द बांधकाम व्यवसायिक मंगलमुर्ती डेव्हलपर्सचे मालक नरेश ठाकुरदास वाधवानी यांना खोटे दस्तावेज बनवून जागा हडपण्याच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे.
पिंपळे सौदागर येथील सर्व्हे नं. ३९/२/२ या जमिनी संदर्भात खोटे दस्तावेज बनवून जमिन खरेदी केल्याचा आरोप वाधवानी यांच्यावर आहे. सदर जमिन कै.श्री.महादेव हरि काढे यांची असून ती जमिन त्यांनी मे.श्रध्दा असोसिएट या भागिदारी संस्थेला पूर्ण मोबदला घेऊन विकसित करण्याकरिता २००६ मध्ये दिली होती. श्री. काढे ३१/१०/२००७ रोजी मयत झाले, त्यानंतर चार वर्षांनी म्हणजेच २०१० साली महेश क्रीपलानी, विजय रामचंदानी आणि मंगलमुर्ती डेव्हलपर्सचे मालक नरेश वाधवानी या तिघांनी खोट्या सह्या करून जमिन खरेदी केली. त्यानंतर श्रध्दा असोसिएटचे भागिदार शांताराम बर्डे यांनी यासंदर्भात चिंचवड पोलीसात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार महेश क्रीपलानी, विजय रामचंदानी यांना याप्रकरणी यापूर्वीच अटक करण्यात आली होती. मात्र वाधवानी हे फरार झाले आणि त्यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने तो फेटाळल्यानंतर चिंचवड पोलीसांनी त्यांना अखेर अटक केली असून एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. चिंचवड पोलीस पुढील तपास करत आहे.





















Join Our Whatsapp Group