पिंपरी (Pclive7.com):- किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात चाकूने भोसकून तरूणांचा खून करण्यात आला ही घटना मोरे वस्ती चिखली येथे शुक्रवारी रात्री घडली.
दिनेश निवृत्ती पाटील (वय २५) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर त्याचा मित्र अतुल गाडे हा गंभीर जखमी आहे. या प्रकरणी पोलिसांनी समाधान रामदास मोरे (वय २४) आणि चेतन रामदास मोरे (२०) या दोन भावांना अटक केली आहे. माझ्याकडे काय बघतोय? या कारणावरून आरोपी मयत तरूणामध्ये शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता भांडण झाले. यातून आरोपींनी चाकू पोटात भोसकून दिनेश यांचा खून केला तर अतुल याला गंभीर जखमी केले. अधिक तपास पोलिस निरीक्षक शंकर आवताडे करीत आहे.






















Join Our Whatsapp Group