पिंपरी (Pclive7.com):- शिवसेनेचे माजी शहरप्रमुख आणि माजी विरोधी पक्ष नेते नेताजी गणपतराव चव्हाण (वय-५७) यांचे दिर्घ आजाराने मध्यरात्री एकच्या सुमारास मोहननगर येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
नेताजी चव्हाण यांनी १९९२ ते १९९७ दरम्यान नगरसेवक पद भूषवले आहे. तसेच गजानन लोकसेवा सहकारी बँकेचे माजी संचालक, मोहनगर येथील शिवतीर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष होते. तर भगवा रक्षक या साप्ताहीकाचे ते संपादक होते.
चव्हाण यांच्या पार्थीवावर त्यांच्या मुळगावी मु.पोस्ट बोरवडे ता.कागल जि. कोल्हापूर येथे दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. तत्पूर्वी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी मोहननगर शिवसेना शाखा येथे ठेवण्यात आले होते. यावेळी स्थायी समितीच्या सभापती सीमा सावळे, मीनल यादव, माजी नगरसेवक मधुकर बाबर, मारुती भापकर, नंदकुमार सातुर्डेकर, योगेश बाबर, गणेश लंगोटे, सारंग कामतेकर, अमित बाबर, तसेच अनेक शिसैनिकांनी श्रद्धांजली वाहिली.






















Join Our Whatsapp Group