पिंपरी (Pclive7.com):- पॅराशूूट कंपनीच्या नावाने बनावट तेलाची विक्री करणाऱ्या दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी येथील मेन बाजारात असलेल्या महालक्ष्मी ट्रेडर्स या दुकानात ही कारवाई करण्यात आली.
![](https://pclive7.com/wp-content/uploads/2023/11/IMG-20231105-WA0005-300x150.jpg)
छीवाराम लादूराम चौधरी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुकानदाराचे नाव आहे. याप्रकरणी निखील दिनकर पाटील यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चौधरी याने त्याच्या दुकानात पॅराशूूट कंपनीच्या नावाने बनावट तेलाची विक्री केली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर दुकानावर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये पोलिसांनी १४ हजार ९५० रुपये किमतीच्या २३८ बनावट तेलाच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.