पिंपरी (Pclive7.com):- राज्य शासनाचा आरोग्य विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका, प्रतिभा महिला प्रतिष्ठान आणि जिजाई प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ११ व १२ जानेवारी रोजी सांगवी येथे गरजू व गोरगरीब रुग्णांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली.
या महाआरोग्य शिबिराबाबत माहिती देताना आमदार जगताप म्हणाले, “सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर गुरूवारी (दि. ११ ) सकाळी ११ वाजता या शिबिराचे उद्घाटन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी सह धर्मादाय आयुक्त नवनाथ जगताप, महापौर नितीन काळजे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित राहणार आहेत.
या शिबीरात ह्दयरोग व शस्त्रक्रिया, किडणी, हाडांचे व मणक्याचे आजार, कॅन्सर व शस्त्रक्रिया, प्लास्टिक सर्जरी, दंतरोग, नेत्ररोग, बालरोग व शस्त्रक्रिया, मोफत श्रवणयंत्रे, मेंदूच्या आजारावरील शस्त्रक्रिया, गरोदर मातांना व्हॅक्सिन, आयुर्वेदिक उपचार, मूत्र मार्गाचे विकार, त्वचाविकार, फाटलेली टाळू व ओठावरील शस्त्रक्रिया, बॉडी चेकअप, एपिलिप्सी, कान-नाक-घसा तपासणी, किशोरवयीन मुलींचे समुपदेशन, गरोदर माता तपासणी, रक्तदाब, स्त्री-रोग, हिमोग्लोबिन तपासणी, राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत समाविष्ट होणारे सर्व आजारांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया, मोफत अॅन्जिओग्राफी, अपंगांना जयपूर फूट व कॅलीपर्सचे मोफत वाटप, मोफत चष्मे वाटप केले जाणार आहे.
या शिबीरात जिल्हा रुग्णालय, वायसीएम रुग्णालय, पवना हॉस्पिटल, रूबी अलकेअर हॉस्पिटल, जहाँगिर हॉस्पिटल, आदित्य बिर्ला हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल, संचेती हॉस्पिटल, पुना हॉस्पिटल, नोबेल हॉस्पिटल, ससून हॉस्पिटल, डी. वाय. पाटील हॉस्पिटल, लोकमान्य हॉस्पिटल, ज्युपिटर हॉस्पिटल, बडे अॅक्सिडेंशीयल हॉस्पिटल, ओम हॉस्पिटल, इंद्रायणी कॅन्सर हॉस्पिटल, ग्लोबल हॉस्पिटल, देवयानी हॉस्पिटल, एमआयएमईआर हॉस्पिटल, पीसीएमसी डॉक्टर असोसिएशन, आयएमए पीसीबी संघटना, पीसीएमसी होमिओपॅथिक संघटना आणि रेड स्वस्तिक सोसायटीसह आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्था व संघटना सहभागी होणार आहेत.
या महाआरोग्य शिबीरात आरोग्य तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांनी रेशनिंग कार्ड, मतदार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना किंवा आधार कार्ड आणणे गरजेचे आहे. तसेच पूर्वी काही आजार असल्यास तसेच त्या आजारावर झालेल्या उपचाराचे रिपोर्ट आणणे आवश्यक आहे. या शिबीरासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक असून, पिंपळेगुरव येथील पीएमपीएमएल बसथांब्याजवळ शिवाजी चौकात असणाऱ्या जगताप पाटील कॉम्प्लेक्समध्ये नाव नोंदणीची सोय करण्यात आली आहे. याशिवाय सतीश कांबळे (८२०८४८७७२३), रामकृष्ण राणे (७९७७५९९५७१), डॉ. दत्तात्रय देशमुख (९८२२९७२९७८) आणि अभिजीत गरूड (९७६२०९४३००) यांच्याशी संपर्क साधून महाआरोग्य शिबीरासाठी नाव नोंदणी करता येईल, असे त्यांनी सांगितले.






















Join Our Whatsapp Group