पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीतील संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने सोमवार (दि.१५ जानेवारी) रोजी सकाळी १० वाजता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार अमर साबळे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे महापौर नितीन काळजे, आमदार तथा भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, ज्येष्ठ नेते आझम पानसरे आदी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी प्रकाशित केलेल्या वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या रोजगार मेळाव्यात १० वी १२ पास, डिप्लोमा, अभियांत्रिकी पदवी, पदवीकाधारक, व्यवसायीक पदवी व पदवीकाधारक, आयपीओ, बीपीओ, आयटी, हॉटेल मॅनेजमेंट, बँकींक, फायनान्स, फार्मास्युटिकल्स्, मार्केटिंग क्षेत्रातील बेरोजगार युवक, युवतींनी आपल्या शैक्षणिक व अनुभवाच्या कागदपत्रांच्या दोन सेटसह सकाळी १० वाजता नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या कार्यालयासमोरील पटांगणात उपस्थित राहावे. असे आवाहन संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने करण्यात आले आहे.