पिंपरी (Pclive7.com):- प्रत्येक बालकाचे लसीकरण करायचे असतेच. यात जन्मल्यावर लगेच एक डोस आणि त्रिगुणी लसीबरोबर एकएक डोस दिला जातो. या नियमित लसीकरणातून ८०% बालकांना सुरक्षा-कवच मिळावे असा प्रयत्न आहे. मात्र सध्या लसीकरणाचे प्रमाण ७०%पेक्षा कमी आहे हे वास्तव आहे हे चित्र बदलण्याची आज गरज आहे. तरी जास्तीत जास्त बालकांना पल्स पोलिओ लस देण्यात यावे असे आवाहन नगरसेविका अनुराधा गोरखे केले.
प्रभाग क्रमांक १० येथील दत्तनगर, विद्यानगर, संभाजीनगर, मोरवाडी, शाहूनगर, लालटोपीनगर परिसरातील बालकांना आज पल्स पोलिओ लस देण्यात आली. त्यावेळी नगरसेविका अनुराधा गोरखे आदी उपस्थित होते. दत्तनगर चिंचवड येथे नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्या हस्ते पल्स पोलिओ मोहिमेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी डॉ. ऋतुजा लोखंडे, मंगल रोकडे, वनिता कांबळे, विशाल गांगर्डे, अंकुश मुंढे, मीनाक्षी गावनेर, मंगल गायकवाड, एेश्वर्यम कंम्पर्ट, विशाल गांगर्डे, अंकुश मुंढे, विनोद टिपरे, अमोल गोरखे आदी उपस्थित होते. तर संभाजीनगर दवाखाना येथे डॉ. हरिदास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेहा खरात, शाहीम खान, मीनल पंचभाई आदींनी सहकार्य केले.



















Join Our Whatsapp Group