रशिया (Pclive7.com):- रशियाची राजधानी मॉस्कोमधील एका कॉन्सर्ट हॉलमध्ये दहशतवादी हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी रात्री (दि.२२) ही घटना घडली. यामध्ये तब्बल ६० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून १४५ पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. आणखी मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात असून या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट ग्रुपने घेतली आहे.
मॉस्कोमध्ये म्युझिक कॉन्सर्टसाठी हजारो लोक एकत्र जमले होते. यावेळी सहा ते सात हल्लेखोरांनी अचानक अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात अनेकजण मृत्युमुखी पडले. हे हल्लेखोर तब्बल १५ ते २० मिनिटे गोळीबार करत होते. यानंतर अचानक कॉन्सर्ट हॉलमध्ये आग लागली आणि स्फोटांचा आवाज झाला. यामध्ये ६० पेक्षा अधिक जण ठार झाले.
रशियन वृत्तानुसार, या हल्लेखोरांनी मोठ्या प्रणाणात स्फोटके फोडली. कॉन्सर्ट हॉलमध्ये आग लावली. तर सोशल मीडियावरील व्हिडीओमध्ये इमारतीवरून धुराचे मोठमोठे धुरांचे लोट दिसून येत आहेत. या घटनेत मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती वर्तवण्यात येत असून यावर रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांची प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.


























Join Our Whatsapp Group