पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आज सोमवार (दि.१५) ४१.९ अंश तापमानाची नोंद झाली आहे. मार्च महिनादेखील अत्यंत कडक उन्हाचा ठरला होता. आता एप्रिल महिन्यात दुसऱ्यांदा सर्वांधिक तापमानाची नोंद झाली आहे. यापूर्वी ४ एप्रिल रोजी ४१ अंश तापमानाची नोंद झाली होती.
नागरिक उष्णतेची लाट ओसरण्याची वाट पाहत आहेत. सकाळी नऊ वाजताच उन्हाच्या काहिलीने नकोसे होत आहे. सकाळी दहानंतर कामासाठी बाहेर पडणाऱ्यांना उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कडक उन्ह असल्यामुळे दुपारी १२ नंतर रस्त्यावर तुरळक गर्दी दिसत आहे. नागरिक देखील दुपारी कामे करणे शक्यतो टाळत आहेत.
दिवसभर घामाच्या धारा आणि प्रचंड उकाड्याचा सामना करणारे नागरिक थंडावा मिळविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. घरातील व कार्यालयातील वातानुकूलित यंत्रणा सतत सुरू आहे.
ढगाळ वातावरणामुळे पंख्याने मिळणारी हवा देखील दमट असल्याने कुलर, एसीचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. गोरगरीब नागरिक थंडावा मिळविण्यासाठी झाडाखाली, मंदिरात किंवा इमारतीच्या सावलीचा आधार घेताना दिसत आहेत.


























Join Our Whatsapp Group