थेरगाव (Pclive7.com):- मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला.
थेरगाव येथील संचेती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील मतदान केंद्रावर पावणे नऊच्या सुमारास बारणे यांनी मतदान केले. यावेळी श्रीरंग बारणे यंच्या पत्नी सरिता, पुत्र प्रताप व विश्वजीत, सून स्नेहा यांनी देखील मतदान केले.