पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभा मतदार संघाची आज निवडणूक पार पडत आहे. महायुतीकडून श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्यात ही लढत होत आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत या मतदारसंघात ३६.५४ टक्के एवढे मतदान झाले आहे. दरम्यान सकाळी ९ वाजेपर्यंत ५.३८ %, सकाळी ११ वाजेपर्यंत १४.८७%, दुपारी १ वाजेपर्यंत २७.१४ % एवढे मतदान झाले होते.
विधानसभा मतदार संघ नुसार टक्केवारी मतदान टक्केवारी
पनवेल – ३४.९३%
कर्जत – ३८.०३%
उरण – ४२.८९%
मावळ – ३७.५%
चिंचवड – ३५.१८%
पिंपरी – ३३.७४%
(मावळ लोकसभा मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत एकूण मतदान टक्केवारी – ३६.५४%)
मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण ६ विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या संपुर्ण लोकसभा कार्यक्षेत्रात २५ लाख ८५ हजार १८ मतदार असून यामध्ये १३ लाख ४९ हजार १८४ पुरूष मतदार, १२ लाख ३५ हजार ६६१ महिला मतदार आणि १७३ तृतीयपंथी मतदार आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण एकूण २ हजार ५६६ मतदान केंद्रे स्थापित करण्यात येणार आहेत. या मतदारसंघात ३३ उमेदवार निवडणूकीसाठी रिंगणात आहेत. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या ९ हजार २३६ बॅलेट युनिट, ३ हजार ५९१ कंट्रोल युनिट आणि ३ हजार ८१६ व्हीव्हीपॅट यंत्रांची सरमिसळ (रँडमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.