पिंपरी (Pclive7.com):- राज्यात सध्या मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे कट्टर समर्थक पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे हे आज तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. मंत्री पदासाठी स्वतः आशावादी असल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

आमदार अण्णा बनसोडे म्हणाले की, मुंबईला बोलावण्याचा निरोप आलेला नाही. मी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांना भेटण्यासाठी मुंबईला निघालो आहे. विस्ताराबाबत माझी त्यांच्याशी चर्चा झाली नाही. पुढे ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांकडे मतदारसंघातील काम घेऊन जात असतो. मंत्री मंडळाचा विस्तार पाठीमागेच व्हायला हवा होता. परंतु, लोकसभेचा निकाल पाहिला त्या दृष्टीने मंत्री मंडळाचा विस्तार व्हायला पाहिजे जेणेकरून मंत्र्यांच्या त्या- त्या मतदारसंघात प्रभाव पडेल. मंत्री पदासाठी मी नेहमीच आशावादी राहिलो आहे.
सध्या राज्यातील मंत्री मंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला असून अजित पवारांचे कट्टर समर्थक अण्णा बनसोडे यांना मंत्री पद मिळेल का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, पिंपरी चिंचवड शहराला अण्णा बनसोडे यांच्या रूपाने पहिल्यांदाच मंत्रिपद मिळावे अशी सर्वच नागरिकांची अपेक्षा आहे.
Tags: अजित पवारअण्णा बनसोडेआमदार अण्णा बनसोडेपिंपरी विधानसभामंत्रिमंडळ विस्तारमहायुतीराज्य सरकारराष्ट्रवादी काँग्रेस