पिंपरी (Pclive7.com):- संपूर्ण भारतामधील क्रीडा आणि आरोग्य क्षेत्रा मध्ये काम करणारे इंडो ॲथलेटिक्स सोसायटीतर्फे सालाबाद प्रमाणे होणाऱ्या पुणे-पंढरपूर-पुणे सायकल वारीचे शनिवारी १५ जून रोजी देहू येथील गाथा मंदिर येथून प्रस्थान करण्यात आले. यंदाचे सायकलवारीचे हे आठवे वर्ष होते. यावर्षी तब्बल १७३४ सायकलस्वारांनी सहभाग यामध्ये नोंदवण्यात आला आहे.
![](https://pclive7.com/wp-content/uploads/2024/06/IMG-20240616-WA0027-300x188.jpg)
एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी नितीन वानखेडे, प्रकाश शेडबाळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हेमंतराव हरहरे, उद्योजक अण्णारे बिरादार, नगरसेवक अमित गावडे, सनदी लेखापाल कृष्णलाल बंसल, डॉ संदीप सानप, महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक श्रीराम पांनझाडे सर, अनिल सानप, उद्योजक ज्ञानेश कटकमवार, कामरआली शेख, उद्योजक माणिक डावरे, वैभव पाडेकर यांच्यातर्फे फ्लॅग ऑफ करण्यात आला. यावेळी आयएएसचे गजानन खैरे, गणेश भुजबळ, अजित पाटील कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते.
या वारीचे हे आठवे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सर्व १७३४ हून अधिक सभासद एक दिवसात देहू ते पंढरपूर असे दोनशे पन्नास किलोमीटर अंतर १५ जून रोजी पूर्ण करण्यात आले. तर दुसऱ्या दिवशी पंढरपूर ते आळंदी अशी परतीचा यावर्षी तब्बल ३७४ महिलांनी सहभाग नोंदवला असे इंडो ॲथलेटिक्स सोसायटीचे पंढरपूर वारी प्रमुख गिरीराज उमरीकर यांच्या तर्फे सांगण्यात आले.
इंडो ॲथलेटिक्स सोसायटीच्या सायकल वारीचा इतिहास..
पायी वारीची वैभवशाली परंपरा असलेल्या भारतामध्ये सायकल वारीची सुरुवात इंडो ॲथलेटिक्स सोसायटीने २०१६ साली फक्त ७ जणांनी सुरू केली. या एकदिवसीय सायकल वारी मध्ये, २०१७ साली २४, २०१८ साली १६० तर २०१९ साली तब्बल ५७० जणांनी सहभाग नोंदवला. पुढे २०२० आणि २०२१ साली करोनामूळे वारीला परवानगी नकारण्यात आली. तरी २०२१ साली अमावस्येच्या रात्री १७५ जणांनी रात्री पुणे ते पंढरपूर अंतर सायकलवर पूर्ण केले. त्यानंतर २०२२ साली १२०० आणि २०२३ साली १५०० तर या वर्षी १७०० हून अधिक संख्या असलेली ही भारतातील सर्वात मोठी आपली संस्कृती व परंपरा टिकवणारी सायकलवारी आहे असे संस्थापक सदस्य गजानन खैरे यांनी सांगितले.
सायकल वारी मार्ग..
देहू – निगडी – नाशिक फाटा – हडपसर – उरुळी कांचन – भिगवण – इंदापूर – टेंभुर्णी – पंढरपूर आणि दुसऱ्या दिवशी याच मार्गावरून परतीचा प्रवास झाला.
नियोजन समिती मध्ये इंडो ॲथलेटिक सोसायटीचा जम्बो टीमचं सहभाग आहे. यामध्ये श्रीकांत चौधरी, अमित पवार, अजीत गोरे, रमेश माने, सुशील मोरे, अविनाश चौघुले, श्रेयस पाटील, प्रतीक पवार, मारुती विधाते, प्रशांत तायडे, रोहित जयसिंघनी, योगेश तावरे, नितीन पवार, प्रमोद चिंचवडे, मदन शिंदे, कपिल पाटील, प्रणव कडू, संतोष नकाते, दीपक बुरकुल, प्रदीपजी टाके, मनोज चोपडे, प्रकाश कांबळे, सुनील चाको यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. सायकल वारीच्या वाटेवर भिगवण सायकलिस्ट, इंदापूर साईकलिस्ट, पंढरपूर सायकलिस्ट, शहा अँड ब्रदर्स यांची मदत झाली.