पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर अॅथलंटिक्स असोसिएशन तर्फे आयोजित स्पर्धेत साई स्पोर्टस अॅकेडमीच्या खेळाडूंनी दैदिप्यमान कामगिरी केली. मधुरा खांबे आणि आस्था जाधव यांनी उत्कृष्ट खेळी करत ही स्पर्धा गाजवली.
भोसरी इंद्रायणीनगर येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलात नुकतीच ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत मधुरा खांबे हिने ४ सुवर्ण पदकांसह १२ वर्षा खालील मुलींमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान मिळवला. तर आस्था जाधव हिने ३ सुवर्ण आणि १ रौप्य पदक मिळवत स्पर्धा गाजवली.
या स्पर्धेत साई स्पोर्टसच्या खेळाडूंनी १२ वर्षाखालील मुलींनी मिळवलेले यश खालील प्रमाणे :-
मधुरा खांबे – सुवर्ण पदक (१०० मी धावणे, लांब उडी, मिडले रिले आणि ४x१०० मी रिले),
आस्था जाधव – सुवर्ण पदक (३०० मी धावणे, मिडले रिले, आणि ४x१०० मी रिले), रौप्य पदक (१०० धावणे),
प्रांजली वाळके – सुवर्ण पदक (मिडले रिले आणि ४x१०० मी रिले), कास्य पदक (उंच उडी),
श्रेयल जलित – सुवर्ण पदक (मिडले रिले),
अद्विका गोखले – सुवर्ण पदक (मिडले रिले आणि ४x१०० मी रिले),
ऐश्वर्या हिंगे – कास्य पदक (३०० मी धावणे),
१४ वर्षाखालील मुलींनी मिळवलेले यश खालील प्रमाणे :-
वेदश्री लोणारी – रौप्य पदक (६०० धावणे),
सृष्टी सिंग – २ सुवर्ण पदक.
१२ वर्षाखालील मुलांनी मिळवलेले यश खालील प्रमाणे :-
पार्थ कदम – कास्य पदक (१०० मी आणि ३०० मी धावणे), कास्य पदक (रिले आणि मिडले रिले),
निखील बागल – कास्य पदक (मिडले रिले, आणि ४x१०० मी रिले),
मयुर यावलकर – कास्य पदक (मिडले रिले, आणि ४x१०० मी रिले),
स्वयंम अौटी – कास्य पदक (मिडले रिले, आणि ४x१०० मी रिले).
१४ वर्षाखालील मुलांनी मिळवलेले यश खालील प्रमाणे :
श्रेयस सुतार – कास्य पदक (उंच उडी),
साई स्पोर्टस अॅकेडमीच्या दोन्ही शाखांमध्ये खेळाडू घडविले जातात. इंद्रायणीनगर येथे राष्ट्रीय प्रशिक्षक शेखर कुदळे आणि पिंपरी नवमहाराष्ट्र विद्यालय मैदान येथे मंगेश पवार खेळाडूंना प्रशिक्षण देतात. तर अॅकेडमीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी दिगंबर राऊत पाहतात. रूस्तम पठाण आणि अविनाश पवार यांनी या अॅकेडमीची स्थापना केली आहे. गेल्या ९ वर्षापासून अनेक राज्य व राष्ट्रीय खेळाडू घडविले आहे. या वर्षी अॅकेडमीच्या ११ खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर कामगिरी केली आहे.






















Join Our Whatsapp Group